संपूर्ण महाराष्ट्रातून असते मागणी – दरवर्षी गणपतीच्या १५ दिवस अगोदरच संपूर्ण गणेशमूर्ती बुक

गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना मूर्तीकारांमध्ये मूर्ती बनवण्यासाठी लगबग

सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशाच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये शेवटचा रंगकाम करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. अमळनेर मधील एक कुटुंब जे आपले संपूर्ण आयुष्य गणरायाच्या सेवेत अर्पण केले आहे. तिसऱ्या पिढीचे परेश भावसार, आपले शिक्षण करत असताना आपल्या कौटुंबिक वारसा असलेल्या कलेला पुढे नेत आहेत. त्यांचे कारखान्यात विविध आकारांच्या, विविध रंगांनी सजवलेल्या गणेशमूर्ती तयार होत आहेत. तयार झालेल्या मूर्ती विक्रीसाठी इतरत्र पाठवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

अमळनेर शहरातील हे संपूर्ण कुटुंब करते बाप्पांची ‘कलात्मक’ सेवा

अमळनेर शहरातील पानखिडकी भागातील संजय भावसार यांचे कुटुंब हे तिसऱ्या पिढीपर्यंत कलात्मक गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहे. संपूर्ण कुटुंब वर्षभर या सेवेत कार्यरत असते.

परेश भावसार यांचे आजोबा, वडील आणि काका यांच्या सह संपूर्ण कुटुंब गणरायाच्या सेवेत मग्न असून, आता अंतिम टप्प्यातील रंगकाम करीत आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. सध्या गणेशमूर्ती तयार असून, रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. गणेशोत्सवात आकर्षक गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे कारागिरांनी आकर्षक मूर्ती बनवण्याचे काम सुरू ठेवले आहे.

कोण आहेत संजय भावसार

संजय भावसार यांनी आपल्या वडिलांकडून ही कला शिकून आपल्या पुतण्यापर्यंत नेली आहे. त्यांच्या कलात्मकतेमुळे अमळनेर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर संजय आर्ट्सच्या गणेशमूर्तींना मागणी आहे. स्वत:च्या मूर्तीचा कारखाना असून, विक्री फक्त आपल्या नेहमीच्या ग्राहकांसाठी ठेवून, ५ हजाराहून अधिक लहान आणि मोठ्या मूर्ती महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर विक्रीसाठी पाठवतात. श्री गणरायाच्या विविध नानारूपी चेहऱ्यांना सजीव देखणे असे चेहरे व संपूर्ण मूर्तीला सजावटीद्वारे तेज देणारे संजय भावसार संपूर्ण तालुक्यातील सुप्रसिद्ध गणपती तयार करणारे संजय आर्ट्स अस एक नाव तयार केले आहे

 

शाळूच्या मातीच्या मूर्तींना देखील यांच्याकडे मागणी

गणेशोत्सवात आकर्षक आणि शाळू मातीच्या गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे भाविकांना वेगवेगळ्या आकाराच्या कोरीव आणि ट्रेंडी मूर्ती हवी असतात. त्यामुळे नवीन काही अनोखे आपल्या ग्राहकांसाठी विशेष गणेशमूर्ती देखील बनवतात. दरवर्षी गणपतीच्या १५ दिवस अगोदरच संपूर्ण गणेशमूर्ती बुक होऊन जातात.

संजय आर्ट्स गणपती मूर्तिकार, ता. अमळनेर, जि. जळगाव. मो.नं. 9421519008 , 9158291982

2021 New Beautiful Ganpati idols in Chinchpokli at Sahil Arts | 2021 Ganpati | Mumbai Cha Ganpati - YouTube

Categorized in:

बातमी,

Last Update: August 18, 2024