मैत्रीदिनी अमळनेरच्या यशस्वी उद्योजक मित्रांची प्रेरणादायी स्टोरी

जीवनात एकतरी अशी स्टोरी असते कि ज्याद्वारे एकतर संघर्ष दिसतो नाही तर परिस्थिती मात्र आजची स्टोरी आहे अश्या दोन मित्रांची ज्यांनी एकत्र येत आपला स्वत:चा एक अमळनेर शहरात नामांकित फूड ब्रँड बनवला न कोणती फ्रँचायजी मॉडेल घेता.

अभिषेक चौक व आदेश  तिसे यांनी शाळेच्या मैत्रीपासून आज आपल्या स्वत:च्या Food Brand अभिज किचन ची निर्मिती करत हजारो लोकांच्या पसंतीला उतरले आहेत. अभिज किचन मध्ये फास्ट फूडपासून ते फॅमिली फ्रेंडली रेस्टॉरंट्सपर्यंत विविधता उपलब्ध आहे. रेस्टॉरंटच्या शैली किंवा संकल्पनेनुसार या ठिकाणी चविष्ठ मेन्यू, सेवा आणि वातावरण वेगळे आहेच आणि हे पाहिल्यावर तुम्ही हि म्हणाल…. एकदम झक्कास

कॅफे म्हंटला कि समोर येतो फास्ट-फूड/अल्पोपाहार (जसे की चहा, कॉफी, स्नॅक्स आणि फास्ट फूड) सर्व्ह केले जातात. मात्र अमळनेर सारख्या शहरात पुणे-मुंबई सारखी चव आणि मनाला ताजेतवाने करणारे कोल्ड्रिंक्स शेकचे विविध प्रकार…. एकाच ठिकाणी २०२० पासुन अमळनेर मधील खवय्यांना चव चाखायला मिळतात हे काही नव नाही ते सुद्धा अभिज किचनमध्ये

नेमकं कशी झाली सुरवात ?

अभिषेक सुनिल चौक (२५) व आदेश अरविंद तिसे (२६) दोघेही बालपणाचे शालेय मित्र आणि शिक्षण करता करता अभिचे M.Com आणि आदेशचे B.Com यांना लहानपणापासुन आवड होती नवीन काही तरी व्यंजन बनवण्याची आणि खाण्याची पण त्यांनी कधी विचार केला नव्हता! आपली हि आवड कधी आपला व्यवसाय तयार होईल अशी दोघांच्या घरच्यांच्या सपोर्ट मुळे एका छोट्याश्या दुकानाने सुरवात करत कोरोना मध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये चोखंदळ व घरी बसून नवीन काही चव ट्राय करणाऱ्या चोखंदळ कस्टमरांना चविष्ट व्यंजन घरपोच द्यायला देखील सुरवात केली. आणि बस हेच होते अभिज किचनच्या प्रगतीच्या मागचे सूत्र… लोकांना आवडणारा आस्वाद आणि सर्व्हिस याच जोरावर या ४ वर्षाच्या कालखंडात नवनवीन पदार्थांची जोड देत अनेकांची मने जिंकली आहे. आज दुमजली असणाऱ्या अभिज किचनचे वैशिष्ट्य म्हणजे फॅमिलीसाठी असणाऱ्या सुविधा व हायजेनिक च्या सोबतीने पारदर्शक सर्व्हिस.

हे आहे खास ! अभिज किचन मध्ये

मित्रांनो फास्ट फूड म्हटलं कि समोर येतो पिझ्झा-बर्गर पण तुम्ही विचार केला का कॉलिटी आणि १८ ते १९ प्रकारांमध्ये असलेल्या अभिज किचन मधल्या या पिझ्झा खाण्यासाठी सुट्टीच्या दिवशी व रविवारी फार गर्दी असते. हो विविध प्रकार बर्गर ७ ते ८ प्रकार आणि यासह अप्रतिम चव असलेले मोमोज, सँडविच, मॉकटेल, थिकशेक, मिल्कशेक, फ्रेंचफ्राईज हे सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ रेसिपी आहेत. त्यातल्या त्यात नानाविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स कॉफी मिल्कशेक यांची चव देखील तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्की!  आपल्या व्यवसायात नवनवीन संकल्पना व सुधारणा करण्यासाठी यांची राज्यात व राज्याबाहेर तेवढीच भ्रमंती देखील असते हे देखील कमालीचे.

 ‘चवी’ ने आणि ‘कमीपणा’ ने मने सुद्धा जिंकली!

कोरोनाच्या संकटकाळी परिस्थितीत लोकांच्या आग्रहास्तव कमी दरात घरपोच सुविधा देत तीच चव आणि तेच उद्दिष्ट साधत लोकांचे मने देखील जिंकले. काही वेळेस पैसा नसतो तर आशीर्वाद देखील महत्वाचे असतात असे त्यांच्या व्यवसायाला प्रामुख्याने मदत करणारे त्या दोघांचे वडील सुनिल चौक व अरविंद तिसे हे देखील आवर्जून सांगतात. कोरोना समयी पोलिस प्रशासन असो अथवा डॉक्टर यांसह आपले हि यात योगदान व्हावे असा व्यवसायात कमीपणा दाखवून नो प्रॉफिट तत्वावर आम्ही आशीर्वाद कमावले हे भाग्य.

मला लहान पणापासून बिझनेस मध्ये आवड होती आणि वडिलांचा देखील केटरिंग व्यवसाय असल्यामुळे मला शिक्षणासोबत नानाविध नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आवड असायची आणि हेच साध्य करत मी व अभि मित्राने आमचा स्वत:चा एक ब्रँड तयार केला आहे.  – आदेश तिसे

गरुडझेप घेण्यासाठी काही गोष्टींना समोर जावे लागते जो पर्यंत तुम्ही काही स्वत:चे नवीन काही करत नाही तो पर्यंत अशक्य आहे. मी आज पर्यंत रोज नवनवीन बाजारात येणाऱ्या रेसिपीसचा तडका घेत अभ्यासकरत आपल्या ग्राहकाला कसे खुश करता येईल यासाठी प्रयत्नशील असतो – अभिषेक चौक

ना ‘शेफ’ ची डिग्री !! ना प्रशिक्षण !!!

या उच्चशिक्षित उद्योजक तरुणांनी कुठलीही हॉटेलिंग क्षेत्रातील डिग्री नाही घेतलीय ना प्रशिक्षण पण यांच्या उद्योगाची चर्चा एक वेगळीच न्यारी रंगत देते ती म्हणजे ‘दुनियादारी’ च्या मैत्री सारखी तिखट, आंबट, गोड असलेल्या फोडणीची यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला अमळनेर 360 न्यूजचा मानाचा मुजरा!

 

लेखन व संकलन

लक्ष्मीकांत सोनार – 9209293194

Last Update: August 18, 2024